विशेष नोंदी (Special Notes) :

विशेष नोंदी (Special Notes) :

      महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या अंतर्गत विशेष नोंदी घेण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाशी पूरक असलेले उपक्रम राबविले जातात. यामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या व्याख्यानमाला पुढीलप्रमाणे.

पूरक उपक्रम :

      महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन, वाचन आणि श्रवण कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी वाचन प्रेरणा दिन, विश्वकोश अवलोकन, वक्तृत्त्व व निबंधलेखन स्पर्धा, भित्तीपत्रकांचे आयोजन, व्याख्याने, हस्ताक्षर व स्वाक्षरी स्पर्धा, मराठी भाषेची लोकपरंपरा समृद्धीसाठी सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेतील पुरस्कारप्राप्त चित्रपट आणि नाटके यांचे महोत्सव भरवून चित्रपट आणि नाटकांच्या अभिव्यक्तीवर चर्चा घडविण्यात आल्या.

अभ्यास सहली :

      मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी वेगवेगळ्या अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयातील मराठी विभागाचे विद्यार्थी भारत सरकारच्या पुराभिलेखागारास भेट देऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पत्रांचे अवलोकन करण्यात आले. अभ्यास सहलीच्या निमित्ताने जोतिराव फुले यांनी सुरू केलेली भारतातील पहिली मुलींची शाळा पाहण्यासाठी पुणे येथील भिडे वाड्याला भेट दिली. मराठी भाषेतील विश्वकोश निर्मिती प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई या संस्थेस भेट दिली. मराठी भाषेच्या बोली समृद्ध आहेत. मालवणी बोलीभाषेच्या अनुभवासाठी विद्यार्थ्यांनी मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील मालवणी बोलीचे अवलोकन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील मालुगंड येथील कवी केशवसुत यांच्या स्मारकास भेट देऊन तेथील मराठी भाषेतील ग्रंथालयाचे अवलोकन करून मराठी भाषेची समृद्धता समजून घेतली.

सामंजस्य करार :

      मराठी विभागाच्यावतीने दोन सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी-शिक्षक आणि मराठी भाषेची समृद्धता जपणार्‍या संस्था यांच्याशी महाविद्यालयाने  सामंजस्य  करार केलेले आहेत. सामंजस्य कराराच्या माध्यमातून, 1) शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (दि. 23-11-2017) आणि 2) महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (दि. 27-02-2018) यांच्या बरोबर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मराठी भाषेविषयी अनेक उपक्रम एकत्रितपणे राबवितात. यामध्ये चर्चासत्रे, कार्यशाळा, लेखक भेट, मुद्रितशोधन पद्धती, ग्रंथाची देवाण-घेवाण, मराठी भाषाविषयक चर्चा यामध्ये सहभागी होतात.

विभागीय ग्रंथालय :

      मराठी विभागाचे ग्रंथालय समृद्ध आहे. 150 ग्रंथसंपदेत कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, वैचारिक चरित्रात्मक ग्रंथ तसेच 15 मासिके उपलब्ध असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत केली जाते. महाविद्यालयाच्या मराठी विभागाची संपादन प्रक्रिया समृद्ध असून आत्तापर्यंत आदिवासी साहित्य, वैचारिक साहित्य आणि बी.. भाग-1 मार्गदर्शक पुस्तिका यांचे संपादन मराठी विभागाने केलेले आहे.

सामाजिक बांधिलकी :

      सामजिक बांधिलकी म्हणून विभागाच्या वतीने शितल बिरंजे, अस्मिता कांबळे आणि दिव्या पाटील या विद्यार्थिनींना मराठी विभागाने दत्तक घेतलेले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मराठी विभागाने स्वीकारलेली आहे. तसेच हेल्पर्स हॅण्डीकॅप, कोल्हापूर या संस्थेला रोख देणगी दिली. ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे महापुराने बाधित चिखली गावातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व वस्तुस्वरूपात मदत.

No comments:

Post a Comment