प्राध्यापक वृंद लेखन कार्य (Faculty Writing:) :
विद्यमान प्राचार्य डॉ. आर.
के. शानेदिवाण 1995 पासून
मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी
‘मराठी कादंबरीतील मुस्लिम समाजजीवन’ या विषयाच्या
अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन
केली आहे. त्यांनी ‘समकालीन संदर्भात यशवंतराव
चव्हाण यांच्या वाङ्मयाची अन्वर्थकता’ या विषयावर बृहत संशोधन
प्रकल्प (Major
Research Project)
पूर्ण केला आहे. त्याचबरोबर 1) मुस्लिमांच्या आत्मचरित्रातील (पुरुष) समाजवास्तव, 2) यशवंतराव चव्हाण यांच्या लेखनातील वैचारिकता,
3) मराठी वैचारिक साहित्य व नरेंद्र दाभोलकरांच्या लेखनातील वैचारिकता,
4) मुस्लिमांच्या आत्मचरित्रातील स्त्री समाजवास्तव या विषयांच्या अनुषंगाने
लघुसंशोधन प्रकल्प (Minor Research Project) पूर्ण केले
आहेत. त्यांनी विविध चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला असून यामध्ये,
4 आंतरराष्ट्रीय, 54 राष्ट्रीय व 6 राज्यस्तरीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यामध्ये सहभाग नोंदवून संशोधनपर लेख सादर केले आहेत. तसेच संपादित ग्रंथातील लेख 11, 19 मासिकामधील लेख आणि
5 सीम लेखन व संपादन केले आहे.
डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या मार्गदर्शनानुसार चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. व पाच विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी संपादन केली आहे. त्यांनी दहा पुस्तकांचे लेखन केले असून यामध्ये, 1) किनारा : काव्यसंग्रह
2) खाली जमीन वर आकाश : एम विमर्श
3) भूमिपुत्र श्रीपतराव बोंद्रे
4) आधारवड
5) मुस्लिमांची आत्मचरित्रे : एक दृष्टिक्षेप
6) भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य
7) यशवंतराव चव्हाण यांची वैचारिकता
8) यशवंत विचार
9) स्पंदन
10) नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार या ग्रंथांचा समावेश आहे.
सध्या डॉ. आर. के. शानेदिवाण श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
सध्या मराठी विभागाची जबाबदारी प्रा. डॉ. डी. के. वळवी यांच्याकडे आहे. त्यांनी ‘शंकरराव खरात यांच्या कथासाहित्यातील भटक्याविमुक्तांचे जीवनचित्रण’ या विषयावर एम.फिल. संशोधन तर ‘आदिवासी लोककथांचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिने अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. संशोधन केले आहे. त्यांनी ‘आदिवासी कवितेचा अभ्यास’ हा यु.जी.सी. लघुशोध प्रबंध (Minor Research Project) व ‘आदिवासी भिल्लांच्या लोकनाट्याचा अभ्यास’ हा यु.जी.सी. बृहत संशोधन प्रकल्प (Major Research Project) पूर्ण केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार 2 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी 4 आंतरराष्ट्रीय, 89 राष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यामध्ये सहभाग नोंदवून संशोधनपर लेख सादर केले आहेत. तसेचत्यांनी चार पुस्तकांचे लेखन केले असून यामध्ये,
1) ‘डुबु डुबुंग चाय चाय’
2) आदिवासी लोककथा : संकल्पना आणि स्वरूप
3) आदिवासी कविता
4) आदिवासी भिल्लांचे लोकनाट्य

No comments:
Post a Comment