नवोपक्रम (Innovation) :
लेखक आपल्या भेटीला :
लेखक आपल्या
भेटीला या उपक्रमामध्ये डॉ. चंद्रकुमार नलगे, फ. मुं. शिंदे, डॉ. राजन गवस, दत्ता
भगत, अरचण म्हात्रे, चंद्रकांत
पोतदार, कृष्णात खोत, खलील
मोमीन, विनायक पवार, हिमांशू
स्मार्त, गोविंद गोडबोले, दीपक
स्वामी, सुनंदा शेळके आणि रघुनाथ साळोखे या मान्यवरांनी
भेटी दिलेल्या असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील
असते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :
मराठी
विभागाच्यावतीने सन 2019 पासून ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात
येतो. यामध्ये चित्रपट महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय
पारितोषिक प्राप्त चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवून त्यावर संवादात्मक चर्चा
घडविण्यात येते. नाट्यमहोत्सव अंतर्गत पुरस्कारप्राप्त
नाटके दाखवून त्या अनुषंगाने अभिनय कौशल्याच्या अंगाने संवादात्मक चर्चा घडविण्यात
येते. याबरोबरच कविसंमेलन, अभिवाचन, शुद्धलेखन, स्वाक्षरी लेखन, निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा उत्यादीचा समावेश आहे.
ओळख लोककलांची :
शाहीरी
परंपरेतील पोवाडा: मराठी
भाषेला समृद्ध लोकसाहित्याची परंपरा लाभलेली आहे. लोकसाहित्यातील
लोककला वर्तमानकालीन जीवनात टिकून राहाव्यात तसेच त्या वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी
दि. 16-01-2020 रोजी शाहीर
डॉ. आझाद नायकवडी यांच्या शाहीरी परंपरेतील पोवाडा या
लोककलेचे सादरीकरण करण्यात आले.
सोंगी भजन :
ग्रामीण
जीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या लोककलांपैकी सोंगी भजन हा महत्त्वाचा कलाप्रकार आहे. पारंपरिक सोंगी भजनांच्या
सादरीकरनातून प्रबोधनात्मक उद्देश साध्य होत आलेला आहे. विद्यार्थ्यांना या कलाप्रकाराची ओळख व्हावी या उद्देशाने रघुनाथ साळोखे
यांच्या ‘सोंगी भजन’ कार्यक्रमाचे
आयोजन दि. 27-02-2020 रोजी करण्यात आले.
सोनाली नवांगुळ :
दि. 4-12-2019 रोजी जागतिक
दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांचा सत्कार व दिव्यांग साहित्यिकांच्या
साहित्याच्या अनुषंगाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
विभागीय ब्लॉग :
मराठी विभागाने
मराठी विषयातंर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे या
दृष्टिने ब्लॉग सुरू केला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून
विभागाची संपूर्ण माहिती, अभ्यासक्रमाची माहिती, संदर्भ साहित्य, विद्यापीठ परीक्षा प्रश्नपत्रिका संच, संशोधन निबंध, पी.डी.एफ. स्वरूपातील ग्रंथ, दैनंदिन ऑडिओ व व्हिडिओ
लेक्चर्स, साहित्यिकांच्या मुलाखती, साहित्यविषयक भाषणे आदिंचा समावेश आहे.
वॉटस्अप ग्रुप :
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी
ऑनलार्उन अध्यापन प्रक्रिया सुरू केली असून यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे
तुकडीनिहाय वॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या आधारे
व्याख्यान, संदर्भ साहित्य, व्हिडिओ, ऑडिओ, युट्युबवरील संदर्भ, प्रश्नसंच व त्याआधारे फिडबॅकची प्रक्रिया गंभीरपणे
राबविण्यात येते.
अध्ययन स्त्रोत :
1) ई-बुक्स : 14
2) पी.पी.टी. बँक : 6
3) ई-जर्नल्स : 13
4) यु-ट्युब ऑडिओज आणि व्हिडिओज् : 42
अंतर्गत मूल्यमापन पद्धती :
विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीसाठी प्रश्नपत्रिका संच बँक, ओपन बुक एक्झाम, प्रिलिमिनिरी एक्झाम, सरप्रार्उज टेस्ट, मौखिक परीक्षा या पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन केले जाते. त्याचबरोबर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापन वही तयार केली असून यामध्ये, गृहपाठ, सेमिनार, प्रोजेक्ट यांचे लेखन करवून घेण्यात येते.
अभ्यासपूरक उपक्रम :
मराठी पदवी प्राप्त केलेल्या स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद माध्यम हा सहा महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स सुरू आहे.
No comments:
Post a Comment