राष्ट्रीय चर्चासत्रे/वेबिनार/कार्यशाळा
(National seminars / Webinars / Workshops)
राष्ट्रीय चर्चासत्रे :
मराठी विभागाच्या वतीने आंतरविद्याशाखीय दोन राष्ट्रीय
चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘'आदिवासी समाज : साहित्य संस्कृती आणि मानसशास्त्रीय अनुबंध' (दि.
23-1-2014) आणि ‘मराठी वैचारिक साहित्याची प्रस्तुतता’
(दि. 12-1-2018) अशी दोन राष्ट्रीय चर्चासत्रे
आयोजित करण्यात आली. प्रस्तुतच्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये
वाहरू सोनवणे, माहेश्वरी गावीत, राजन गवस,
अशोक चौधरी, जगन कराडे, विश्वनाथ
शिंदे, रवींद्र ठाकूर, किशोर बेडकिहाळ,
ज. रा. दाभोळे, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे, जयदेव
डोळे आणि अशोक चौसाळकर यांचा समावेश होता. या संदर्भातील प्रोसिंडग
तयार करण्यात आले. ही प्रोसिडिंग 978-9383796-19-9 व ISSN
2349-638-X-If 3.025 अशी आहेत.
वेबिनार :
कोरोना कालावधीत विभागाने ऑनलाईन टिचिंगची प्रक्रिया
गंभीरपणे राबविली. या अनुषंगानेच अभ्याक्रमपूरक असा महामानव डॉ.
बाबसाहेब आंबेडकर : जीवन व कार्य’ (दि. 30-6-2019) आणि अनुवाद : सिद्धांत
आणि उपयोजन’ या विषयावरील आंतरविद्याशाखीय वेबिनारचे यशस्वी आयोजन
केले. (दि. 12-9-2020) या वेबिनारमध्ये
मान्यवर व्याख्यातांना निमंत्रित करण्यात आले. प्राचार्य सुनीलकुमार
लवटे, डॉ. अर्जुन चव्हाण आणि पृथ्वीराज
तौर या व्याख्यात्यांनी आपले मौलिक विचार मांडले.
कार्यशाळा :
महाविद्यालयातील मराठी भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत वेगवेगळ्या नाविण्यपूर्ण विषयांवर कार्यशाळांबरोबरच महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत स्वतंत्र कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
No comments:
Post a Comment