सोयी-सुविधा (Facilities) :

सोयी-सुविधा (Facilities) :

     मराठी विभागामध्ये पुढील सोयी-सुविधांचा समावेश आहे. मराठीच्या सुरूवातीच्या काळापासून ज्या लेखक-कवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा मान्यवरांची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अध्ययन-अध्यापन पद्धतीमध्ये आय.सी.टी. (संगणक, एल.सी.डी. प्रोजेक्टर) साधनांचा प्रभावीपणे वापर करण्यात येतो. मान्यवरांची साहित्यविषयक विचारप्रक्रिया समजून येण्याच्या दृष्टिने व्याख्याने, कवीसंमेलन, सी.डी.ज्, चित्रफिती, चित्रपट, नाटके, माहितीपट, लघुपट, भित्तीपत्रके उत्यादींचा संग्रह विभागामध्ये जतन करून ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आवश्यक संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तके, प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतात.

    मराठी विभागामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत. सदरच्या डिजिटल फलकाच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत साहित्यिक वि. . खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विं. दा. करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांचा संक्षिप्त परिचय आणि साहित्यकृतींची ओळख करून देण्यात आलेली आहे. भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराप्रमाणेच मराठी साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार सन 1955 ते सन 2020 पर्यंतच्या मराठी भाषेतील वसंत आबाजी डहाके, अशोक केळकर, माणिक गोडघाटे, जयंत पवार, सतीश काळसेकर, डॉ. जयंत नारळीकर, अरूण खोपकर, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख, . सू. पाटील आणि सलीम मुल्ला या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची माहिती संकलित करून त्याचा डिजीटल फलक तयार करण्यात आलेला आहे.

      कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध साहित्य परंपरा लाभलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी सावंत, विश्वास पाटील, राजन गवस, कृष्णात खोत, शंकर पाटील, रणजीत देसाई आणि आनंद यादव या साहित्यिकांचा संक्षिप्त परिचय आणि त्यांच्या साहित्यकृतीची ओळख मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी डिजीटल फलक तयार करण्यात आलेला आहे

    The Marathi section includes the following facilities. From the earliest days of Marathi, information has been made available to the students about the writers and poets who have made significant contributions. ICT in teaching-learning method. (Computer, LCD projector) devices are used effectively. In order to understand the literary thought process of the dignitaries, a collection of lectures, poets' conventions, CDs, videos, films, plays, documentaries, short films, posters etc. has been kept in the department. Necessary reference books, text books, question sets are made available to the students along with the study papers.

    Digital boards have been set up for college students in the Marathi department. Through this digital panel, Bharatiya Jnanpith Award-winning literary Vs. C. Khandekar, Vs. Or. Shirwadkar, Vin. Da. Karandikar and Bhalchandra Nemade are briefly introduced and literary works are introduced. Similar to the Bharatiya Jnanpith Award, the Sahitya Akademi Award in Marathi Literature from 1955 to 2020 was given to Vasant Abaji Dahake, Ashok Kelkar, Manik Godghate, Jayant Pawar, Satish Kalsekar, Dr. Jayant Narlikar, Arun Khopkar, Asaram Lomte, Shrikant Deshmukh, M. Su. The digital panel has been created by compiling the information of Sahitya Akademi Award winning writers Patil and Salim Mulla.

      Kolhapur district has a rich literary tradition. Shivaji Sawant, Vishwas Patil, Rajan Gavas, Krishnat Khot, Shankar Patil, Ranjit Desai and Anand Yadav from Kolhapur district will be briefly introduced and their works will be introduced to the students of Marathi department.

No comments:

Post a Comment